हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा...???
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना....
नशिबाने एकदा पुन्हा कुठे भेटू...
आठवणींना एकदा एकत्र मिळून वेचू...
पण तेव्हा सारं काही बदललेलं असेल...
...कुणीतरी बोलावताय म्हणून भेट लौकर सुटेल...
लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत...
आठवणींचा हाच झरा त्या दिशेने वाहणार नाही...
आज सोबत आहोत मनासारखे जगून घेऊ ...
जीवनभर पुरातील अश्या आठवणी साठवून घेऊ ....!!!!
No comments:
Post a Comment