Tuesday, September 13, 2011

मन माझे काही करावयास धजेना,

मन माझे काही करावयास धजेना,
आशा आहेत अनेक, सुरूवात सापडेना...
अनेक वेळा सांगतो माझ्या वेडया मनाला,
प्रेमाविना नसे अर्थ ह्या जीवनाला...
मन मोहून टाकतो सांजचा हा वारा,
मनास उमाळा येतो शोधितो मी निवारा...
प्रेमांकुशामध्ये होते कोंडी मनाची,
यातना करूनही सापडेना पाउलवाट जीवनाची...
आज मन घाबरते सांगू व्यथा कुणाला?
आहे माझ्या मनाची ठाऊक कथा कुणाला?
अखेर जय मिळालाच माझ्या वेड्या मनाला,
प्रेमाविना नसे अर्थ ह्या जीवनाला...

No comments:

Post a Comment