म्हणे सखी लिही शब्दात प्रेमाला
मी क्षणात पुढे तिच्या ठेवले मनाला
भांबावली थोडी म्हणे वाचू कशी मी ?
जीव तो अजाण विचारे ह्या जीवाला
स्तब्ध होवुनी गाळले तिने आसवाला
जे न कळले कुणा,कळले त्या डोळ्याला
दबक्या चालीने आजकाल विचारही वावरतात
उगाचं दचकतं अदृश्य तुझ्या सावलीला बावर मन,
साम-दाम-दंड-भेद हताश कनवटीला बसतात
अंकुश सुटतो जेव्हा जागतं तळवटातील स्वप्न..!!
आकाश भरून चांदणे वाटून दिले तुला
मी ओंजळीभर "शब्द"घेवून चालतो आहे
तुला चंद्र म्हणून दिवाने ओळखतात सारे
मी अंधार सारून इथला तुला लिहितो आहे
काल रात्रभर तळमळलो तुझ्या आठवणींत
सुजलेले डोळे देत होते खुल्या डोळ्यांनी साक्ष,
कशी जाणीव करून द्यावी हालत मजनूची
मात्र तुज सामोरी पाहता ओठ घेती तुझाचं पक्ष..!!
No comments:
Post a Comment