प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय ?
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?
तिला पाहण्यासाठी दिवसभर तळमळायचे
ती जवळ आली कि दूरवर पळायचे
पळकुटेपणाला या काय प्रेमाचे म्हणतात पाय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?
तिने काही दिले तर(?) सर्व काही बरे असते
नाही दिले तर मात्र त्या प्रेमाचे काही खरे नसते ?
प्रेमभांगाशिवाय मग त्यांच्या समोर नसतो पर्याय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?
मिलानाशिवाय यांना दुसर काही दिसत नाही
प्रेमामध्ये यांच्या यांच्याशिवाय कोणी भिजत नाही
दोन मन जुळण्यासाठी मग सर्व जग विसरण्याचा पर्याय?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?
प्रेमाला विरोध नाही माझा , नाही त्या भावनेला विरोध आहे
पण सर्व राहावे सुखी यासाठीच तर नेहमी त्या प्रेमाचा शोध आहे
पण आजकाल भरकटली प्रेमवाट आणि भरकटले पाय ?......
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?
प्रेम म्हणजे कसे कृष्ण राधेसारखे असावं
त्याच्यामध्ये नेहमी त्याग आणि बलिदान दिसावं
आताच्या प्रेमामध्ये या दोघांची जणूकाही गरजच नाय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?
ज्याला समजला अर्थ तो नेहमी सुखात जगेल
देवाजवळ नेहमी दुसरयाच सुख मागेल
ज्याला कळला अर्थ त्याचे आपोआप टळतील सर्व अपाय
याच्या पेक्षा प्रेमाचा दुसरा अर्थ तरी काय ?
प्रेम प्रेम करतात सगळे हे प्रेम म्हणजे काय
मला तरी सांगा कुणी या प्रेमाचा अर्थ काय?
No comments:
Post a Comment