Tuesday, September 13, 2011

विचारले मी सगळ्यांना प्रेम हे नक्की काय असतं ?

विचारले मी सगळ्यांना
प्रेम हे नक्की काय असतं ?

कुणी म्हणे प्रेम करावे लागते.
कुणी म्हणे प्रेम आपोआप होते.
...कुणी म्हणे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं सेम असतं.........!

कुणी म्हणे आग का दरिया है
कुणी म्हणे चाहत का नशा है
कुणी म्हणे इश्क कमीना
कुणी म्हणे औरो के लिये जीना........!

कुणी म्हणे एक आविष्कार
कुणी म्हणे एक साक्षात्कार
कुणी म्हणे मनाचे दर्पण
कुणी म्हणे सर्व काही अर्पण..........!

कुणी म्हणे जीवनाचं गाणं
कुणी म्हणे लोभसवान स्वप्नं
कुणी म्हणे सुंदर भावना
कुणी म्हणे सतत वेदना...........!

कुणी म्हणे टाईम पास
कुणी म्हणे एकदम झकास
कुणी म्हणे जगण्याला अर्थ
कुणी म्हणे घालवणे वेळ व्यर्थ..........!

कुणी म्हणे प्रेम हे सर्वस्व
कुणी म्हणे कुणाचे वर्चस्व
कुणी म्हणे बेदुंध एक नशा
कुणी म्हणे आत्मभान एक आशा...........!

कुणी म्हणे स्वतःचा त्याग
कुणी म्हणे अविभाज्य भाग
कुणी म्हणे फक्त भूक
कुणी म्हणे प्रश्न मूक........!

कुणी म्हणे नात्याची तहान
कुणी म्हणे विचार महान
कुणी म्हणे एक बंधन
कुणी म्हणे हृदयाचे स्पंदन..........!

कुणी म्हणे कायमची मैत्री
कुणी म्हणे विरहाच्या रात्री
कुणी म्हणे अतूट विश्वास
कुणी म्हणे जीवनाचा ध्यास..........!

कुणी म्हणे इश्वराची भक्ती
कुणी म्हणे स्वतःपासून मुक्ती
कुणी म्हणे स्वतःचा स्वार्थ
कुणी म्हणे केलेला परमार्थ...........!

कुणी म्हणे सुखाचा शोध
कुणी म्हणे मिळणारा बोध
कुणी म्हणे एक अनुभूती
कुणी म्हणे आत्मीक शक्ती..........!

कुणी म्हणे मिळालेली क्षमा
कुणी म्हणे व्यक्ती बद्द्ल तमा
कुणी म्हणे मनाची कामना
कुणी म्हणे होणारी प्रेरणा...........!

कुणी म्हणे अंतरीची आग
कुणी म्हणे येणारी जाग
कुणी म्हणे निनाद सप्तसूर
कुणी म्हणे यापासून दूर...........!

कुणी म्हणे क्षणिक सुखः
कुणी म्हणे मिळणारे दुखः
कुणी म्हणे स्वतःची प्रगती
कुणी म्हणे विचारांची क्राती...........!

कुणी म्हणे मिळणारे ज्ञान
कुणी म्हणे लागणारे ध्यान
कुणी म्हणे मनातील उधान
कुणी म्हणे मिळणारे समाधान........!

येवढे वेगवेगळे विचार
वेगवेगळे अनुभवलेले क्षण
प्रत्येकाचा निराळा अनुभव
प्रत्येकाचा वैचारीक दृष्टीकोन

नाही होत समाधान
घोडं तिथेचं अडतं
कृपया नेमक्या शब्दात सांगा
प्रेम हे नक्की काय असतं.........?????

No comments:

Post a Comment