किरणांनी पहाटे मोती उधळले
पाणी भरल्या त्या ढगांवारती.
तीच ओंजळ बघ रिती केली
पावसाने सख्या आपल्यावरती !!!
ढगांच्या पाठशिवणीच्या खेळात सखे आज
माझ्या जीवाची ही अनामिक घालमेल,
तू नाहीस सोबतीला वळीवाच्या मोसमात
कोरडाचं मी असून अल्लड सरींची रेलचेल..!!
पाउस वेडा दाटून आला
ती निघून जाता
घेऊन गेली मेघ सोबत
डोळ्यातून बरसून जाता
तुझ्या आठवणींचे ओझी
पेलवत नाहीत आता
आयुष्याच्या कॅनव्हासवर
रंगं चिकटत नाहीत आता...
तू येताना मी कायम
खूपच आतुर
आज तू नाही तेव्हा
पाउसही फितूर...
बरसताना आभाळ
मी उघडा राहतो
देह भिजतो माझा अन्
मी आतून कोरडा होत जातो
प्राक्तन माझं किंवा योगायोग म्हण आविष्काराचा
तुझ्याशिवाय मनाचं माझ्या झालं नाही कुठेचं एकमत,
आलीस आणि सर्वार्थाने समरस झालीस माझ्यात
चांगुलपणा तुझा की सौंदर्याच्या देणगीची नजाकत..!!
No comments:
Post a Comment