Monday, September 12, 2011

मनी भेटीची ओढ होती सख्या सोबत ,पावसाची सर होती .

मी सांगणार आहे माझ्या मनाला

तू चोरून येतोस ,मला भेटायला .

बघितलच कुणी सख्या तुला ,तर

जातोस पापण्यांच्या आड लपायला




मनी भेटीची ओढ होती
सख्या सोबत ,पावसाची सर होती .
दोघांनी पाहिलेली स्वप्नेसुद्धा
दोन पावले आपल्या पुढेच होती.

वाटेतली फुलेसुद्धा सख्या
तुडवत काट्यांना येत होती.
नकळत का होईना पण
मध्येच डोकावून पाहत होती.

रात्रीनंतर पहाट आणि पुन्हा रात्र
रोजच सख्या होत होती.
पण येता जाता दुपारही
रोज चांदण उधळत होती !!!

अशाच सख्या गंधित अंगणी
प्रीती आपली फुलत होती .
वरून किरणे रात्रीही
ओंजळीतून मोती उधळत होती !!!!!!!!!!

No comments:

Post a Comment