एकदा वाटलं करावी रंगरंगोटी काव्यरूपी सागराला
पण कुंचला अपुरा पडला पोहोचण्या त्या तीराला,
लाख मोलाचे शब्द उजळवण्याचा आवाक्याबाहेरचा यत्न
नाहीचं साध्य झालं अखेरपर्यंत ह्या वेड्या पीराला..!!
पाहून तुला चंद्र म्हणे चांदणीला
भू-वरी हा मोती कुणी माळला
तू पापण्यांचा भार हळूच उचलता
पाहून रूप तुझे चन्द्र तो ओशाळला
घेणे आणि तडजोड करणे ह्या दोन्ही ही गोष्टी आयुष्यात तितक्याच महत्वाच्या आहेत....
जुळवून घ्या.. जेव्हा कोणाला तरी तुमच्या बरोबर रहावस वाटत, आणि
तडजोड करा.. जेव्हा तुम्हाला कोणाबरोबर तरी रहावस वाटत.
वाचनीय..!!
No comments:
Post a Comment