कॅसानोवा बनलो होतो मी...
प्रेम असं काही नसतच असं स्वतःलाच समजावत होतो मी...
पण कुठून कोण जाणे, कुठल्या निमित्ते,
नकळत तिने मी स्वतःला घालून घेतलेल्या बेड्यांचे पाश तोडले...
कोरडे पडलेल्या माझ्या हृदयास तिच्या येण्याने भिजते केले...
प्रेम अशी कुठलीच भावना जगात नसते असे ओरडून सांगणारा मी..
तिच्या सहवासात आकंठ बुडवून घेतले स्वतःला..
अजाणतेपणी का होईना तिचे आकर्षण स्वस्थ बसू देईना..
हळूहळू प्रेम ह्या संकल्पनेला अनुभवू लागलो,
कितीही सुंदर मुली दिसल्या तरी तिचे सौंदर्य ते अप्रतिम,
कशीही असली तरी ती माझी होऊ दे तो मोह अन मी तिचा गालिब..
ती रुसून जेव्हा दूर गेली, वाटलं सारं काही संपलं..
तिच्या प्रत्येक प्रतिक्रियेचे हजार अर्थ शोधिता..
स्वतःलाच घडवत होतो मी..
ती तशीच राहावी हा नाहक हट्ट माझा..
तिला मी आवडावे हि वेडी माझी आशा..
प्रेम ते काय हेच असतं उमगत होतं आत्ता..
कॅसानोवा बनलो होतो मी...
प्रेम असं काही नसतच असं स्वतःलाच समजावत होतो मी...
-तिच्या प्रेमात घायाळ असा एक कॅसानोवा-
No comments:
Post a Comment