Wednesday, November 2, 2011

गेले ते दिवस

गेले ते दिवस
जेव्हा माझे बोल मधाहून गोड होते
माझे डोळे बोलके होते
माझा चिवचिवाट तुला आवडत होता
ज्याला तू मझा निरागसपणा म्हणत होता ..

गेले ते दिवस
जेव्हा मझी फ़िगर ऐश्वर्या सारखी होती
मी दिलेली अंगठी तुला जीव की प्राण होती
माझा हसरा चेहेरा तुला खुलवत होता
ज्याला तू माझा स्वच्छंदीपणा म्हणत होता

गेले ते दिवस
जेव्हा माझी हरेक अदा निराळी होती
माझी आठवण तुला सतावत होती

माझा लटका राग तुला आवडत होता
ज्याला तू माझा खेळकरपणा म्हणत होता

गेले ते दिवस
जेव्हा मझ्या हाताला चव होती
अगदी चटणी भाकरी सुद्धा गोड होती
मझा हटटीपणा तुला आवडत होता
ज्याला तू माझा स्वभिमान म्हणत होता


गेले ते दिवस
जेव्हा तुझ्या मझ्यात प्रेमाचा ओलावा होता
मझ्या प्रेमात तू आकंठ बुडाला होता
आज झालाय जो विद्रूप हाच तो चेहरा होता
ज्याला तू सारखा I LOVE YOU म्हणत होता

No comments:

Post a Comment