आवडलं असत मलाही
सुंदर अस हे जीवन
आनंदात जगायला
खळखळनार्या नदीसम
स्वछंदी वाहायला .............
आवडल असत मलाही
खूप खूप सख्या करायला
पायांत पैंजण घालून
मनसोक्त बागडायला
इंद्रधनुच्या रंगामध्ये
जीवन चित्र रंगवायला
रिमझिमत्या सरींमध्ये
चिंब चिंब नहायला............
आवडलं असत मलाही
आईच्या कुशीत लोळायला
बाबांच्या खांद्यावर
तासंतास खेळायला
आजीच्या छान छान
गोष्टी ऐकायला
आजोबांसवे बागेत
फिरायला जायला .........
पण , जन्माला येताच
मला हे कळून होत चुकले
मुलीच्या जन्माने या
साऱ्या आनंदाला मुकले .........
पैंजणान जागी पडल्या
नियमांच्या बेड्या
प्रत्येकवेळी समजवायचं
म मनाला या वेड्या .........
पावला पावलाला मग
सर्वांनीच रोखायच
खळखळून हसायलाही
नेहमीच टोकायचं......
का नाही मला तो हक्क
जो वंशाच्या दिव्याला असतो
मुलींना का जगण्याचा
अधिकार नसतो .........
शिक्षणास माझ्या
पैसा वाया जातो
मुलगा शिकला का
मात्र तो कामी लागतो
का हा भेद भाव
का हि वागणूक ........
मुलींनी काय तर
सांभाळायची चूल
का ती हि नाही वाटत
एखाद नाजुकस फुल........
मुलीच्या जन्माला का
नेहमीच लागते बंदी
आनंदाने जगण्याचीही
का तिला कमीच येते संधी ....................
No comments:
Post a Comment