मला पाहीलेस की..
की तु धावत कवेत यायचे...
तुला कवेत घेऊन मी..
तुझ्यावर शब्द रचायचे...
होता तुझ्या मिठीत...
एक प्रेमळ विसावा...
असा तो क्षण वाटतो...
सतत आठवावा...
उदय नवा अस्तताना
दूर दूरवर पळणाऱ्या रस्त्यांना
वर्षोन वर्ष खेटून उभ्या असणाऱ्या वस्त्यांना
रोजच ओवाळतात ठेवणीतले ते सूर्य...चंद्र
आणि कोटी कोटी वर्षांचा हिशेब करतात
एका ओझरत्या भेटीत
क्षितीज्याच्या पार.........
प्रकाश आणि अंधाराच्या फाटक्या चादरीवर कुणी नसतांना
तुझ्या प्रत्येक अश्रूची..
कींमत मला मोलाची....
माझ्या साठी तुझी सुखं...
आहेत त्याच तोलाची
तुझ्या अश्रूमध्ये वसले
आहे माझे जीवन
किंमत खूप आहे त्या
अश्रूची माझ्या जीवनात
कारण तूच आहे माझ्या
सुख दुखालीत खरी राणी.....
No comments:
Post a Comment