Wednesday, November 2, 2011

प्रेम ते सोळाव्या वर्षीचे

प्रेम ते सोळाव्या वर्षीचे
होते कोणाला ते उमजले
म्हणे लोक त्यास आकर्षण
खरे प्रेम करणार्यास ते समजले :)



पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी
कोण मी आहे ?मला ठावूक नाही नाव माझे
शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी
सोबती काही जीवाचे यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवा खाली चिता माझी जळावी
काय सांगावे तुला मी ,काय बोलावे परी मी
राख मी झाल्यावर गाणी माझी तुला स्मरावी
तारकांच्या मांडवा खाली चिता माझी जळावी

No comments:

Post a Comment