Wednesday, November 2, 2011

ई - मेल ..

ई - मेल ..

उजवीकडे तारीख ..
मग मायना ..
नंतर मजकूर ..
बुद्धीबळातल्या उंटासारखा
तिरका वाकडा धावणारा ..
तसं बर चाललय आयुष्य
असं पानभर सांगणारा ..
खाली डावीकडे लिहिलेलं
कळावे .. लोभ असावा ..
तळटीप .. ता . क . उगाच ..
काहिसं निरर्थक .. पण
पत्राचा स्कूल पैटर्न पूर्ण करणारं ..
.
.
आज ती सारी पत्र ..
कपाटातून बाहेर सांडली ..
आणि .. समजलं
त्या निरर्थक भावनेलाही
किती अर्थ होता ..
त्या पत्राला सखे ,
तुझ्या हाताचा स्पर्श होता ..
.
.
आज सातासमुद्रापलिकडून
रोज येतात तुझी फ़ॉर्वर्डेड ई मेल्स
पण .. त्यात .. तू कुठे ग दिसतेस ..
.
ह्याला विज्ञानाचा
शाप म्हणावं की वरदान ..
संभ्रमात मी आहे थोडी ..
निर्णय पक्का झाला की ..
मीही तुला ईमेलच करणार आहे ..

No comments:

Post a Comment