ऐसे नव्हे कि शायरी या शायरानीच गायली
कमलासवे भ्रमारादिकांनी आधीच होती गायली
पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी आम्हा दिले
फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले...
आसवे नयनात या निर्मिली नसती कुणी
नावही शायरीचे ऐकले नसते कुणी
ज्यांनी दिला दर्द नयनी आसवेही निर्मिली
मी नव्हे,हि शायरी त्यांनीच आहे निर्मिली...
प्रत्येक माणसाला आपण जीवनात
काहीतरी नवीन कराव अस वाटत असत
परंतु अशा जीवनाची सुरवात कोणीतरी आधी करून गेलेला असतो
तरी प्रत्येकाला आपण काहीतरी नवीन करतो अस का वाटत असत ?
खेळ हा दोन नशिबांचा,
इथे अगदी निराळाच आहे,
दोघांची हार, नाहितर दोघांचीही जीत,
हाच ह्या खेळाचा एकुलता "नियम" आहे.
तुझ्या आठवणीनी,
माझ्या भोवती पाश आवळला आहे,
होवू देत गं कहीही,
उगीचच नाही मी हा ''त्रास'' निवडला आहे...
त्रास तुझ्या असूनही नसण्याचा
भास तुझ्या नसूनही असण्याचा
काय सांगू "छंद" हा वेडा लागला
क्षणात हसण्याचा क्षणात रडण्याचा....
मनातले प्रेम लपवन्याचे,
तू अनेक बहाने केलेस,
पण चोरून पाहणा-या "नजरेला",
तू उत्तर काय दिलेस.....???
भावनाच एवढ्या मोठा
कि शब्धच कमी पडतात,
म्हणूनच ओठान एवजी,
त्या "डोळ्यांनी" व्यक्त होतात....
एक गुपीत एकदा एका बातमीला
गुपचूप जाऊन म्हणाला
नको जास्त बघूस या "आरश्यात "
वेळ नाही लागत मला तुझ्यासारखं व्हायला....
नको न्याहाळूस
तुझे "प्रतिबिंब" आरश्यात
दिसेल ते तुला
माझ्याही डोळ्यात !!..
पहाट होताच डोळ्यांवर,
सूर्य प्रकाश आला,
"स्पर्श" होताच त्याचा,
मला तुझा भास झाला....
तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते .....
No comments:
Post a Comment