येईन मी परत..
तुझे डोळे अश्रूंनी भिजवायला...
भिजेलेल्या डोळ्यांना तुझ्या...
माझ्या खांद्यावर निजवायला...
डोळ्यात तुझे प्रतिबिंब...
हृदयात तुझी प्रित...
जवळ येऊन ही पळतेस दूर...
अशी कशी तुझी प्रेम करण्याची रीत...
फ़्राय केले पापलेट...
कोळंबीचा केला रस्सा....
सोबत नाचनीची भाकरी...
आहे रविवारचा बेत असा..
नवी नाती जोडता जोडता...
जूनी तुटून जातात...
वर वर तुटली असली तरी..
ती मनात खोल घर करून राहतात..
मागे वळून पाहताना...
मस्त गोड हसायचीस...
त्या हसण्यातच मला..
पुढच्या भेटीसाठी आतुर करायचीस..
माझ्याकडे रोखून पाहताना...
डोळे तुझे एकटक पाहायचे...
तुझ्या डोळ्यात पाहताना...
तुला पाहायचेच राहायचे..
पाहु नको माझ्याकडे असे...
हृदयात होतात कंप....
मन तुझ्या बाजूने होते ...
सारे शरिर करते संप....
No comments:
Post a Comment