Wednesday, November 2, 2011

आली असेल का त्याला ,माझी इतकी याद

मी न्हवतं बोलावलं, पावसाला आज
का बरं यावं त्यानं, असं अवेळी आज ?

आली असेल का त्याला ,माझी इतकी याद
म्हणून का त्याने ,अशी घातली असेल साद ?

भिजवून चढवतो तो ,सगळ्यांनाच साज
भिजावं वाटलं असेल का, त्यालाही आज?

ओल्यानी द्यायची असेल ,त्याला सरींना साथ
हवाय का त्याला माझा , त्याच्या हातात हात ?

भरलंय का आभाळ त्याचं ,आठवणींनी आज
म्हणून का त्याने मला ,असं भिजवलं आज ?
खरच मी न्हवत बोलावलं ,पावसाला आज ................

No comments:

Post a Comment