प्रेमाचे फुटाने
प्रेमाचे फुटाने,कुणा तिखट कुणा खारे लागले आहे
बरगळ्यांच्या पेटीत बंद हृदयास वारे लागले आहे
वाटे वाटेत,चौका चौकात भरलेले गुलाबांचे प्रदर्शन
मजनू,रोमियो किताब मिळविण्यास सारे लागले आहे
एक काजवा अंधार वेडा कुणा आमिष देतो उजेडाचे
सांगा कधी कुणा हाती का दिवसा तारे लागले आहे
ते नदीचे किनारे,बगीचे साक्षीदार त्या गुलाबी भेटींचे
रोज त्याच त्या आठवणींचे स्पर्श न्यारे लागले आहे
खेळ हा वाटे हवा हवासा कधी हसणे कधी रडणे यात
जिंकणे गूळ खोबरे वाटते,हरनेही प्यारे लागले आहे
No comments:
Post a Comment