खूप झाल्या कागदावरच्या कविता
आयुष्याचं गणित सोडविण म्हणतो,
शब्दांचे रचले रम्य इमले आजवर
वास्तवाच्या सागरात पोहीन म्हणतो..!!
शब्दांच्या कोट्या मार्मिक ठरल्या
जीवनाचा आशयघन मांडतो आहे,
एकेकाळचा शब्दांचा धनी आज
विचारांती शब्दांशीचं भांडतो आहे..!!
रुचले नाहीत पुरेपूर शब्द माझे
कार्याची जोड तिला हवी आहे,
जुने झाले तेचं गोड गोड शब्द
अपेक्षांची नांदी मात्र नवी आहे..!!
शब्दांचं स्पूर्तीस्थानचं मागतंय
प्रेमाच्या धोपट दिनक्रमात बदल,
अखंड टिकवायचीये प्रेमभावना
पार करतोय शब्दांची दलदल..!!
हृदयाच्या प्रेमासाठी मनाचे काव्य
भोगतंय आज पिळवटणारी शिक्षा,
तारतम्य साधून मन आणि हृदयाचं
प्रेमपुजारी मागतोय शब्दांची भिक्षा..!!
No comments:
Post a Comment