स्वप्नपरी भरून जाते मी
होता स्पर्श तुझा...
.
मेणां परी विरघळून जाते मी
मिठीत तु घेता ..
रात्रीला मी म्हंटल ,
अग जरा हळू चालत जा ,
झोप लागलीय नुकतीच
चंद्राला आता कुठे ,
जरा कमी ठुमकत जा..........
साखरझोपेत पहाटेच्या
स्वप्ने त्याला पाहू देवून
प्रीतीचा शिंपडत रंग
स्वप्नांना थोडं त्याच्या
फुलवत जा ..................
रुप पाहून चांदण्याचं
पडलेली भूल त्याला
आभाळाला दाखवून
त्यालाही थोडसं
मनी खुलवत जा .......
तू समोर असताना
अंधारालाही मनचं थोडं
लाजत का होईना पण
कांही बोलू देत जा .....
यायच्या आधी पुरवाई
साज तुझा उतरून
रूप तुझं साजिरं
पहाटेच्या दवात तू
थोडं निरखून जा ..........
No comments:
Post a Comment