Wednesday, November 2, 2011

भर दुपारी वळवाच्या पावसाने

भर दुपारी
वळवाच्या पावसाने
चेहऱ्यावर शिंपडावे
तृप्तीचे थेंब ....
तशी तुझी भेट !!!!!!

मिळावी दृष्टी
आंधळ्याला अचानक
अन त्याच्या डोळ्यांची व्हावी
या जगाशी भेट .......
तशी तुझी भेट!!!!!

भरतीच्या वेळी
सागराच्या लाटेने
येऊन भिडावं
किनाऱ्याशी थेट .....
तशी तुझी भेट !!!!!!

अवसेच्या रात्री
गडद अंधारात
काजव्याने चमकून
दाखवावं बेट.......
तशी तुझी भेट !!!!!!

शब्दांच्या जगात
संगीताच्या मैफिलीत
सुरांनी घ्यावी
गाण्याची भेट .......
तशी तुझी भेट !!!!!!

No comments:

Post a Comment