केली का कन्यादान कचरा कुंडीला
जन्म द्यायचाच नव्हता तर का घडवले गोळ्याला
बाबा मला सांगा तुमच्यात नव्हती का हिम्मत
कधीच कळली नाही का तुम्हाला मुलीची किंमत
...
दानात दान श्रेष्ठ दान म्हणतात ना कन्यादान
काय देणार दान कसे बसणार ताठ करून मान
ना तुम्हाला मुलगी नाही मिळणार जावई
तुमचा दारात कधीच नाही वाजणार मंगल सनई
आई मला सांग तुझी ओटी आशी कशी ग खोटी
जन्म घेण्याआगोदरच मला लावलेस वाटी
काय माझी चूक काय माझे पाप
जन्म घेण्याआगोदरच यवढा मोठा शाप
No comments:
Post a Comment