दु:खानंतर सुख आल्यावर
माणूस जरा गोंधळतो,
"असं अचानक सुख का?"
असं देवाला विचारतो!!
आधीतर दु:खी माणसाला
सुख ओळखताचं येत नाही,
नशिब इतकं दयावान का?
याचं कारण कळत नाही!!
दु:खाची सवय झाली की
सुख विचित्र, नकोसं वाटतं,
नशिबाने दाखवलेली दया
स्वाभिमानाला सुख नकोसं वाटतं!!
"आपण आपल्या दु:खात बरे, या
उशीरा येणाऱ्या सुखाची गरज काय?
कदाचित आपण सुखाच्या लायक नाही
अशा हावरटपणाची गरज काय?"
खरंतर देवाने दिलेलं हे बक्षिस
आपण प्रेमाने स्विकारायचं असतं,
पुढे परत हवं तेवढं दु:ख
दोन क्षण सुखात जगायचं असतं..!!
No comments:
Post a Comment