Monday, August 22, 2011

जगी सर्वात सुंदर पवित्र हे नाते आई लेकराचे

आई नंतर माउली बनते अशी ताई पण मायाळू,
सात जन्म साथ देईल अशी सखी पण तर हवीचं
चला तर मग अवघ स्त्रीपण ओवाळणीत सांभाळू..!!

राहू कटिबद्ध जपाया त्यांना आणि त्यांच्या ममतेला
संसारी ह्या जगाच्या मातृत्वाशिवाय नाही निभाव,
सुधर रे समाजा आतातरी दे रूढी परंपरा झुगारून
कुलदिपकाच्या नावाखाली आलाय लक्ष्मीचा अभाव..!!

अक्का ताईच्या भावांनो आता कमान तुमच्याचं खांद्यावरी
मन करा खंबीर धरून नव्याची कास अन मोडा समजूत ही जुनी,
"रक्षण करेल मी घरी-दारी निरागस स्त्रीत्वाचं आणि तिच्या जन्माचं"
घ्या शपथ आता ह्या नव्या युगाच्या पवित्र रक्षा बंधनाच्या दिनी..!!

भावा बहिणीच्या प्रेमाच्या ह्या पवित्र अशा रक्षा बंधनाच्या सर्व मित्र मैत्रिणी आणि "ताई" साहेबांना हार्दिक शुभेच्छा..!!

No comments:

Post a Comment