Monday, August 8, 2011

दोन मित्र वाळ्वंटातून चालत जात असतात

दोन मित्र वाळ्वंटातून चालत जात असतात. अचानक त्यांच्यात भांडण होतं आणि एक मित्र दुसरयाच्या थोबाडीत मारतो. जो मित्र मार खातो तो दुखी होतो आणि काहीही न बोलता तो वाळूत लिहितो की "आज माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राने माझ्या थोबाडीत मारलं."

ते दोघे पुन्हा चालू लागतात. वाटेत एक छोटंसं तलाव येत. दोघे आंघोळ करायची ठरवतात. पण ज्या मित्राने थोबाडीत मार खाल्लेला असतो तो अचानक तलावा जवळच्या दलदलीत फसतो आणि बुडू लागतो. पण त्याचा मित्र त्याला वाचवतो. मरता मरता वाचल्यावर तो मित्र एका दगडावर कोरून लिहितो की "आज माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राने माझे प्राण वाचवले."

तेव्हा पहिला मित्र ज्याने दुसरयाच्या थोबाडीत मारलेली असते आणि मग त्याचेच प्राण वाचवले असतात त्या दुसरया मित्राला विचारतो की "जेव्हा मी तुला मारले तू ते वाळून लिहिले आणि जेव्हा मी तुला वाचवलं ते तू दगडावर कोरले. असं का?"

दुसरा मित्र म्हणतो की "जेव्हा कुणी आपल्याला दुखी करतं तेव्हा ते आपण वाळूत लिहावं जेणेकरून क्षमा आणि वारयाबरोबर ते लगेच पुसलं जावं आणि जेव्हा कुणी आपल्यासाठी काही चांगलं करतं तेव्हा ते आपण दगडावर कोरावं जेणेकरून वारयाबरोबर ते कधीच पुसलं जाणार नाही." -

No comments:

Post a Comment