Monday, August 8, 2011

आम्ही दोघे मित्र पण कधीच भेटलो नाही

आम्ही दोघे मित्र पण कधीच भेटलो नाही
सोबतच हसलो आणि सोबतच रडलो

सोबत असूनही आमची कधीच नाही होत भेट
नियतीने निर्माण केले आमच्यामध्ये छोटेसे गेट

जीवनाच्या प्रत्येक क्षणाला सोबतच अनुभवतो
हसतो जसे सोबत तसे सोबतच रडतो

खंत ना कधी आम्हा आमच्या न भेटण्याची
स्पर्श ना एकमेकांचा गरजही न वाटे त्याची

आम्ही दोन डोळे आमची आशीच मैत्री
मिटलो तरी सोबत मिटू एवढीच देतो खात्री

No comments:

Post a Comment