जमिनीवर सांडलेल्या फुलांचा सडा सखे
मनापासून आवडतो मला तो सुगंध वेचायला,
स्वखुशीने फुलं आपली होतात दरवळत
त्यांना खुडण्याची सल नसते मनात बोचायला..!!
गारद ग मी सजणे तुझ्या सौंदर्य तीराने
जीव माझा गुंतला तुझ्या पायीच्या गोंदनात,
घे उचलुनी स्पर्शुदेत काळजाला प्रीती
जखडून ठेव मजनूला तुझ्या हृदयाच्या कोंदणात..!!
आठवतंय सख्या तुला ,बाहुला- बाहुलीच लग्न?
जे आपण लहानपणी खेळत होतो.
ते खोट लग्न खर समजून
आजची स्वप्न तेंव्हा बघत होतो !!!!!!!!१
शिकून सवरून Modern झालात म्हणून
लाज नको रे चारचौघात मराठी भाषेची,
आईसमान मानता ना रे ह्या मायबोलीला
मग संवादातून ओटी भरा रे तिच्या आशेची..!!
तुझ्या माझ्या नात्याचा अर्थ तुला कळेना...
माझ्या मनातील गुपित तुला काही उमजेना..
कधी गाशील प्रिये प्रेमाचा तराना...
माझिया प्रियेला प्रीत कळेना...
No comments:
Post a Comment