Monday, August 15, 2011

साथ योग्य असेल साथीला

वसंताची कोकीळा का ग हि शरमिंदा
भुलली जणू ती जेव्हा छेडलीस तू तान,
मंजुळ सुरावटी सखे तिलाही पाडतात कोड
गर्वहरण जिथे कोकिळेचं................
राहिलं कसं बर ह्या सख्याला भान..??



मनाने घेतलं मनावर एकदा
नाही जायचं तिच्या आठवणींच्या गावा,
पण मनंच ते मनमानीचं वागणार
धाडलाचं फिरून त्याने आठवणींचा थवा..!!



साथ योग्य असेल साथीला

तर मैफिलीला रंग येतो.

शब्दही छान असतील जोडीला

तर गाण्याला छान सूर लागतो !!!!!!!!!



मी तुझ्या मागे वेडा नव्हतो
पण मला तुझ्याशी बोलयला आवडायचे
मी तुला आपलुकीने सर्व विचारायचे
पण तुला ते बंधन वाटयचे
तुझ्या स्पर्शाने मला कधी मजा नाही आली
पण तुझ्या स्पर्शाने मला सुख जाणवायचे
तुझ्या मनात काय होते ते मला नाही कळायचे
पण तुझे वागणे तीरस्कारासारखे वाटायचे
मी शांत राहिलो कि तुझे सारखे बोल बोल करायचे
पण त्यात हि गप्प राहणे मला शहाण्यासारखे वाटायचे

No comments:

Post a Comment