Tuesday, August 23, 2011

मी तुझी सख्या शेकोटी रे !!!! बघ ना जरा जवळ येवूनी

गुंतला जीव हा तुझ्यात कधीचा सखे
तू गारवा प्रभाती मी ते विखुरलेले धुके
बघ उडते ते सोनेरी सूर्य किरणांचे थवे
रूपाने तुझ्या चकाकती दवांचे आरसे

धुक्यातल्या त्या गारठ्यातली
मी तुझी सख्या शेकोटी रे !!!!
बघ ना जरा जवळ येवूनी
ऊब देण्याची माझी हातोटी रे !!!!!!!!!!!!


सुगंध आमचा चहूकडे पसरला..
ओल्या या मातीस ही तो न चुकला..
जिवनच आमचे फुलायचे दुसरयांसाठी..
फुलून मग सुकायचे दुसरयांसाठी..


का बघताय असे..
आमचे जीवन फूलणे अन गळने..
या मातीतून उगवलो आम्ही..
अन या मातीतच मिसळून जाणे..

No comments:

Post a Comment