ती कशीही असली तरी मला ती आवडते,
कितीही मस्करी केली तरी सगळं काही विसरायला लावते,
तिच्या सहवासात राहावे सतत मला वाटते,
ती निघून गेली कि एक विषण्णता मनामध्ये दाटते,
असे जरी असले तरी तिला सांगायचे राहूनच जाते,
तिच्यावरचे प्रेम माझे मौन बाळगून तिच्या आठवणीत झुरत राहते,
कवी जरी मी असलो स्वैरछंदी,
तिला काव्यात उतरवणे मला कठीणच होऊन बसते.
No comments:
Post a Comment