Tuesday, August 23, 2011

माझ्या कोकण देशात

माझ्या कोकण देशात
उषाकाल गातो गाणी
सूर्य नभी उगवतो
करी सोन्याची पेरणी!
जागोजागी उड्या घाली
बाळकृष्ण माझा झरा
येई सरी मागे सर
हिरवीगार करी धरा!
झाडे पिटतात टाळ्या
वारा वाजवितो पावा
त्याच्या मंजूळ वाणीने
भूल पडतसे जीवा!
काय सांगू कोकणची
लीला आगळीवेगळी
नांदतात एकोप्याने
सारी पाने-फुले-वेळी!
अशा कोकणदेशाची
आठवण दाते उरी
जाते सह्याद्रीच्यावर
मन मारते भरारी!!

No comments:

Post a Comment