राहू दे .................
हलक्या फुलक्या आठवणी त्या अश्याच राहू दे
पापन्यान मध्ये आसवांच्या घड्या तश्याच राहू दे
दडवू नको त्या सुगंधास केसात तुझ्या राणी
वाऱ्यास पकडुनी हात तुझा मनसोक्त वाहू दे
का अबोला हा धरुनी तू बंधीस्त केले त्यांना
उकलून ओठांच्या पाकळ्या शब्दास जिवंत होवू दे
किती समजावू मी निजेला तू नसुनी असते येथे
मज घेवून ती उश्याशी म्हणे खोटे खोटेच पाहू दे
भटक्याच त्या वाटा वीसरल्या माझ्या घराला
मुक्कामास वेदनांना आज थोडी वीश्रांती घेवू दे
No comments:
Post a Comment