Monday, August 8, 2011

मैत्री ला एक वृक्ष म्हणू

मैत्री ला एक वृक्ष म्हणू ...मित्र सारे त्यावरली पाने फुले जणू
फांद्यांचा आधार घेऊ ......उंच वाढू मैत्रीची उंची पाहू

एक फुल तू बन एक पान मी
एक फांदी हाताची एक फांदी सहवासाची
घट्ट रोऊ पाळे मुळे या धर्तीत
मित्र बनवू तिलाही , नसेल भीती उखळून पडण्याची

भूक लागली तर उन खाऊ
वादळाला येवू दे सोबतीला आपण नको भिऊ
मैत्रीचे बळ बघ सारे मिळून अजमाऊ
संकटे येतीलही बहु संकटाना तोंड देऊ

घरटी बांधतील पक्षी अनेक
घरटा त्यात आपल मैत्रीच एक
निवास त्यांचा चिलबिलाट सारा
सर्वांनी मिळून सांभाळू हा मैत्रीचा पसारा

हिरवी पालवी मैत्रीची ,फुलोर हा मित्रांचा
बहरून जायील वृक्ष हे इथे खेळ भावनाचा
गंध पसरू चारी दिशांनी ,
बंध एक निराळ्या भाषांनी

पाहतील वाटसरू मैत्रीचे हे वृक्ष डोळे भरुनी
सांगतील किसे कधी ..तर लहान मुलांना अपुली मैत्रीची कहाणी
अशीच फुलुदे .अशीच वाढू दे निरंतर बांधून मैत्री राहील
बुंधा मजबूत आहे विश्वासाचा हे वृक्ष असेच वाढत राहील

No comments:

Post a Comment