Monday, August 15, 2011

ऊन पावसाच्या या खेळात..

मी पाहिलंय तुझ्या डोळ्यात..
तिथे मीच आहे सजलेला..
माझा प्रत्येक शब्द..
तुझ्या प्रेमाच्या पावसात भिजलेला..

ऊन पावसाच्या या खेळात..
दोघेही गेलो भारावून..
त्यांच्या सवे चाल सखे..
आपण हि जाऊ न्हावून...

किरणांचा हात धरून सख्या मी चंद्रावर गेले

चांदण्यांच्या नजरेतून मीही तुला पहिले .

नजरेतल माझ्या प्रेम पाहून ,काळीज चांदण्याचं जळले,

अन..चंद्राच्या बदल्यात त्यांनी तुला कि रे मागितले !!!!!!!!!


शब्दांच्या या मायाजाळात..
आता असा फसलो आहे....
तुझ्या सोबत चार क्षण..
पुन्हा येथे जगलो आहे..

No comments:

Post a Comment