पाऊस असतोच भिजायला
सख्या छत्रीशिवाय हिंडायला .
हात हातात आला कि
...ओल्या मिठीत शिरायला !!!!!!
सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.
मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.
तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले.
ek number
ReplyDelete