घराच्या छपरावर रात्री नभीचा चंद्र पहुडला होता,
घरात यावं की नाही ह्याचं विचारात रखडला होता,
वेडाचं तो चंद्र, रात्रभर तळमळला एकटाचं मला प्रकाशून
अन तो मात्र माझ्या पायरीवरचं जखडला होता..!!
तुझ्या माझ्या सोबत..
चाललेली ती अजाण वाट..
अजूनही आपण सोबत येण्याच्या..
आहे ती संभ्रमात..
सांग सखे जगण्याचे
काय शोधू कारणे?
मरण्याचे आज माझ्या
सामोरी हजार उदाहरणे?
तू साद देत असशील तर
मी नेहमीच लिहत राहील
शब्द बनून मग मी तुझ्या
मनात हळूच शिरत जाईल
मी पाहिलंय तुला..
मला चोरून पाहताना.
माझ्या डोळ्यांशी नजर भेट होताच..
मनात खुदकन हसताना..
No comments:
Post a Comment