Tuesday, August 23, 2011

तुझ्या अबोल शब्द मध्ये...

तुझ्या अबोल शब्द मध्ये...
स्तब्ध माझ्या साठीच प्रेम..
तुझ्या बोलक्या डोळ्यांमध्ये...
का मग हे अश्रुंचे थेंब..

अक्षरांनी सख्या झेप घेतली बघ
मनातून माझ्या ओठांकडे .
त्यांचेच बघ गीत जाहले
धाव घेत तुझ्या मनाकडे!!!!

रंग बघ मी त्यात ओतले
तुझ्या नि माझ्या मनातले ;
भाव बघ मी त्यात सांडिले
प्रेम भरल्या डोळ्यातले !!!!!!

सूर बघ रे त्यात उमटले
खळखळनाऱ्या पाण्यातले ;
नाद बघ रे ,त्यात ऐकले मी ,
झुळझुळनाऱ्या झरयातले !!!!!

गंध बघ मी कसे आणिले
दरवळनाऱ्या मातीतले ;
थेंब त्यातून कसे टिपीले
कोसळणाऱ्या पावसातले !!!!!!!!
त्याचेच बघ रे गीत जाहले, धाव घेत तुझ्या मनाकडे ..................

No comments:

Post a Comment