तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो…..
आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात…
तुला भेटण्यास काल
ग्रीष्म आला होता
रूप तुझे बघून तो
चक्क चैत्र झाला होता
तू लाजलेली असताना मी सये
शब्दांना ही लाजताना पाहिलंय,
तू सामोरी पाहून कित्येकदा मी
रुसलेल्या शब्दांना हसताना पाहिलंय
No comments:
Post a Comment