अंगात लालभडक डगला
अन डोक्यावर काळी क्याप घालून
चोकातल्या कोपरयावर ती उभी असते
वाट पहात .......आनोळखी चेहर्यांची ........
प्रत्येकांच्या हाताकडे......खिशाकडे तिची सराईत नजर
ती बांधील नसते कुणाशी ......
काही क्षणांची तिची निष्ठां.......पण प्रमाणिक
स्वताहपुरती......
तिच्या पोटात साठलेल्या
अनेकांच्या भावना.......इछा...वासना....
सकाळी १० वाजता एकदा
अन सायंकाळी ५ वाजता एकदा
तिची डिलीवरी ........................
अन लगेच पुन्हा सुरु
तिचे सम्पर्क आभियान .................
ती उपाशी राहू शकत नाही
म्हणून तर ती
उभी असते चोकातल्या कोपरयावर
वाट पहात .........कुणीही चालते तिला
आगदी कुणीही i
No comments:
Post a Comment