तुझ्या आठवणीत रोजचं जळून सखे
एक दिवस चिता मला जवळ घेईल,
तुझ्यासाठी रंगवलेल्या प्रेमाची स्वप्ने
अतृप्त मनाने माझ्यासोबत नेईल..!!
का नाही ग समजत तुला कधी
माझ्या अंतरीची निशब्द तळमळ,
असलो वरून जरी शांत संयमी
तरी मनमंदिरी सदा खळखळ..!!
डावलून सखे मला तू कायमसाठी गेलीस
सांग माझा अपराध वागलीस अशी परखड
विचार करून आता विचारही हा शिणला
निववू कसे ह्या धुपणाऱ्या मनाचे कढ..!!
तुझा तळवा माप ओलांडेल माझ्या घरचं
असं धूसरही नाही भासत आता हे प्राक्तन,
घाव जरी घातलास तू हा जिव्हारी माझ्या
भळभळनाऱ्या जखमेचं करीलं मरणांती जतन..!!
No comments:
Post a Comment