Monday, August 15, 2011

मावळचे आंदोलन पाण्यासाठी पेटले

मावळचे आंदोलन पाण्यासाठी पेटले

मावळचे आंदोलन पाण्यासाठी पेटले
मेलेल्यांना शेवटी दोन घोट पाणी पण नाही भेटले

कोणाला काय भेटले याचा हिशोब होत राहील
निवडणुकांच्या अजेंड्यावर हा हि एक विषय राहील

आणि तेव्हा या विषयावर मोठ मोठी भाषणं होतील
मतांच्या स्पर्धेमध्ये दोन चार फुलेही वाहतील

मेलेल्यांना म्हणतील सगळेच आता हुतात्मे
निवडणुकाच्या वेळी जागे करतील त्यांचे आत्मे

त्याची पूर्वतयारी आताच सुरु झाली
मृतांच्या नातेवाइकाना भेटण्यासाठी गर्दी झाली

सहानुभूतीच्या शब्दांनी त्यांचे आश्रू पुसतील का
मावळ मधले हुतात्मे एवढ्या लवकर मावळतील का

त्यांच्या हुतात्म्याचे मोल तेव्हाच फिटणार आहे
जेव्हा पवनेचे पाणी मावळच्या मातीला भेटणार आहे

No comments:

Post a Comment