काय डौलाने झुलतेय ग ,
ती नथ तुझ्या नाकात . . .
सौंदर्य तर खुलतेय ग ,
पण अडथळा का प्रेमात . . .
प्रितीचे गुलाबी आकाश
आजून आहे दूर
तरी
क्षितिजाच्या पलीकडून
येत आहेत सुर
विणलेला प्रत्येक खोपा
ऐकत नाही पाखरांची चिवचिव
तरी
सुगरण खोपा विणत जाते
वेड ?,,,,कदाचित प्रेमही !
कुणी बोलते मनापासून
कुणी बोलते मानभावी
तरी
अर्थ आपणच लावत असतो
मनास भावतो तोच शक्यतो
जरा समजून घेऊ स्व:तहाला
एकमेकाच्या सहआस्तित्वाला
तरी
शक्यता जपून ठेवू योग्य वेळ येईपर्यंत
बस थोड़ी कळ काढ माय डियर तो पर्यंत
No comments:
Post a Comment