कसे सांगू तुला
की काय वाटले मला
तू डियर म्हटल्यावर .........
शक्य असते तर
टिपले असते भाव
तुझ्या डोळ्यात दाटलेले
मला डियर म्हणताना ............
शक्य असते तर
पाहीले असतेस तुही
माझ्या मनात उठलेले वादळ
तुला डियर म्हणताना ............
सकाळी चहात साखर टाकायला विसरले
मॉर्निंगवॉक चा रस्ता चुकले
दाराच्या चोकटिला टक्कर घेतली
इस्री चा चटका बसला
चौकात सिग्नल तोडला
क्लासमध्येही मन नव्हते थाऱ्यावर
सर म्हणाले,काय आज मूड नाही ?
कुणी सांगावे त्यांना
काय होते माणसाला
कुणी डियर म्हटल्यावर
जेवतानाही भिरभिरत होते मन
आई म्हणाली , हें काय आवलक्षण
कुणी सांगावे तिला
काय झाले मला
तू डियर म्हटल्यावर
कसे सांगू तुला
काय झाले मला
तू डियर म्हटल्यावर ..............
No comments:
Post a Comment