Monday, August 8, 2011

गोंधळ कसला इथे काम चालू आहे

गोंधळ कसला इथे काम चालू आहे
कार्यालयात फायलांचा आराम चालू आहे
पायताण झिजवा किवा देह झिजवला तरी चालेल
टेबला खालून पाकिटात हरीनाम चालू आहे

रसत्याला खड्डे पाडणारा माणूस भला आहे
त्यातून मार्ग काढने म्हणे आजकाल कला आहे
जिथे हवे त्या पासून मैलभर लांब चालू आहे
श्रद्धा-सबुरीच्या नावावर बांधकाम चालू आहे

चर्चा चारलोकात झाली तरी तिला लोकसभा नाव आहे
शेवटून पाहिलंच सुधारणे साठी तुमचंच गाव आहे
पुढार्यांची सध्या परदेश दवरयांची धूमधाम चालू आहे
गोंधळ कसला इथे काम चालू आहे ......

आश्वासन म्हणे.. धीर धरा महागाई कमी होत आहे
सरकारी कागदावर पहा झुणका भाकर मोफत आहे
चोपदरी मार्गावर लिहून पुढे रस्ता जाम चालू आहे
गोंधळ कसला इथे काम चालू आहे ...........

प्याकेज देवून पहा हे कृषी प्रधान देश वाचवत आहे
एका भाकरीची भूक तुकड्यावर भागवत आहे
कास्तकाराचा भरवश्यावर गाळणे घाम चालू आहे
लाख मोलाच्या पिकला जाहीर भाव छद्दाम चालू आहे
गोंधळ कसला इथे काम चालू आहे .....

सुरक्षेच्या नावाखाली करोडात कोण सुरक्षित आहे
परदेशातल पकडण्याच्या नादात घरातलं दूर्लकशीत आहे
शुssस.. शांतता बाळगा...आतंकवाद्यांचा इथे मुक्काम चालू आहे
गोंधळ कसला इथे काम चालू आहे ...

No comments:

Post a Comment