ऐक दिशा ऐक नेतृत्व
स्वीकारले प्रजेचे पितृत्व
वरून कठोर धीरगंभीर
आत प्रेमळ मातृत्व
तळागाळातील मराठी माणूस
ताठ मानेने केला उभा
मनामनात पेटवून मशाल
उजळवली स्वातंत्र्याची प्रभा
शेजारी तर जल्मावाच
तुझ्याही घरी हवा आहे
आता प्रत्येक घरात
ऐक शिवाजी हवा आहे
No comments:
Post a Comment