Tuesday, August 23, 2011

नाही कळले प्रेम तुझे.. जे ओठांनी बोलायचे..

शब्दांच्या शाळेत मला..
पुन्हा एकदा जायचे आहे..
अ आ इ ई पुन्हा एकदा..
पाटीवर गिरवायची आहे



तिला वाटतं ती रुसुन बसली की,

मी तिला लाडीगोडी लावुन मनवावं,

पण मी सुद्दा मुद्दाम अडुन राहतो,

असं लटक्या चेहरयाचं दर्शन का सोडावं.


मोठे होता होता..
सुटली शाळा अन फुटली पाटी..
आता फक्त धावतोय...
उज्ज्वल भविष्या साठी...


नाही कळले प्रेम तुझे..
जे ओठांनी बोलायचे..
कि गहीवरल्या डोळ्यांनी..
अश्रुंसंगे वाहायचे...?


No comments:

Post a Comment