Tuesday, August 16, 2011

तुझ्यावर कविता करावी तर

तुझ्यावर कविता करावी तर
योग्य शब्द सापडत नाहीत.
आणि जे कांही सापडतात ,
ते तुझ्यासाठी पुरत नाहीत.

तुझ माझ्यावरच प्रेम शब्दात सांगाव
तर शब्दही मुके होतात.
पण तुझ्यासमवेत तेच शब्द
स्पर्शातून बोलू लागतात.

माझ्यावरचा तुझा विश्वास
माझ्या प्रत्येक श्वासात आहे .
विश्वासाशिवाय जगण म्हणजे
श्वास कोंडून मरण आहे .

तुझ्याशिवाय माझ जगण
आत्म्याशिवाय शरीर आहे.
समजून घेतलस मला तू
म्हणून तर माझ जगण आ

No comments:

Post a Comment