Monday, August 15, 2011

एकदा सहज म्हणून तिला विचारलं

माझ्या डोक्याचा मला हेवा वाटतो सख्या

जो तुझ्या खांद्यावर विसावतो.

पण त्याचवेळी तो क्षणही नकोसा वाटतो

कारण तेंव्हाच तर आपण निरोप घेतो ............


रक्ताची नाती असली तरी सख्या
त्यांच्या रक्तावर आपला हक्क नसतो.
म्हणूनच तर वेळ आली कि
परकाच आपल्या उपयोगी पडतो


एकदा सहज म्हणून तिला विचारलं
का नाही गं वागत लोक आपल्याशी चांगलं,
भासवतात नुसतं साथ आहे कायमसाठी
पण पूर्णपणे आपलेपणाचं स्वप्न तर भंगलं..!!

ती चलाख अगदी सहजतेने उत्तरली कशी
भल्या-बुऱ्याचा जमाना आजकाल ह्यानेचं नटली सृष्टी,
"नसतो जगात कुणीही पूर्णपणे चांगला वा वाईट",
पारखायला शिक रे माणसं राजा ठेऊन सारासार दृष्टी..!!

No comments:

Post a Comment