आजही अंगावर शहारे येतात.
ती
रात्र आठवली
की आजही
अंगावर शहारे
येतात. आम्ही
येवल्याहून
निघालो होतो,
रात्रीतून
नाशिकला
पोहोचायचे
होते. पावसाचे
संततधार गाणे
सुरुच होते.
येवल्या
च्या
पुढे एक नाला
दुथडी भरुन
वाहत
होता.
पुलावरुन
पाणी जात होते
दोन्ही
बाजूला वाहने
अडली होती.
पाच-दहा
मिनिटातच
पाणी ओसरले अन
मार्ग खुला
झाला. आता त्या
पुलावर
अडकलेली
पन्नास ते साठ
वाहने सोबतच
धावू लागली.
साधारण
दहा-पंधरा
किलोमीटरवर
पुन्हा एक पुल
लागला.
तोदेखील
दुथडी भरुन
वाहात होता.
आम्ही थांबलो,
आजुबाजूचे
ग्रामस्थ
सांगत होते की
पाणी जास्त
नाही...तुम्ही
जाऊ शकता.
हळूहळू वाहने
त्यांचा
मार्ग काढत
होते. आमची
मारुती
सुखरुप पुढे
जाईल का अशी
शंका मनात
डोकावत
असताना
ड्रायव्हरने
मनाचा हिय्या
करुन कार
पाण्यात
टाकली. कार
जसजशी पुढे
जाऊ लागली तसे
पाणी वाढू
लागले.
कारच्या
खालच्या
भागातील
होल्समधून
पाणी यायला
सुरुवात झाली.
बघताबघता
आमची पावले
बुडाली.
घोट्याच्या
वर पाणी लागले
आणि बरोबर
पुलाच्या
मध्यभागी
येऊन कार बंद
पडली. लाईटस
बंद पडले,
आजुबाजुला
मिट्ट काळोख
पुलाचे
कठडेही
पाण्यात
बुडालेले.
आजुबाजूला
लाल, गढूळलेले,
उफाळलेले
पाणीच पाणी.
माय मराठीत
ज्याला सात
गेले अन पाच
राहिले
म्हणतात तशी
आमची अवस्था
झालेली... मनात
देवाचा धावा
सुरुच होता.
शेवटी माझे
पती व
ड्रायव्हर
खाली उतरले,
कार ढकलत नेऊ
लागले.
पायाखालचा
रस्ता अनोळखी.
पुलाचे कथडे
माहित
नाही...दोन्ही
काठावर
लोकांचा
आरडाओरडा
कानावर पडत
होता. पूल
ओलांडायला
लागलेले पाच
ते दहा मिनिटे
आम्हाला
पाच-दहा
वर्षासारखे
भासले होते.
हळूहळू
कारमधील पाणी
कमी व्हायला
लागले.
पलिकडच्या
काठावरची
माणसे जवळ येऊ
लागली. जीवन अन
मृत्युच्या
मधील
सीमारेषा
किती पुसट
असते ना? आम्ही
कारमधले
सर्वचजण त्या
पुसट रेषेला
स्पर्श करुन
आलो होतो.
आम्हाला
सुखरुप बघून
काठावरील
लोकांनी एकच
जल्लोष केला.
नकळत आमचे हात
जोडले गेले.
कोणती अलौकिक
शक्ती होती
आमच्या
पाठीशी? थोडे
खाटखूट करत
गाडी सुरु
झाली.
नाशिकच्या
दिशेने धावू
लागली, गाडीत
एक निशब्द
शांतता
पसरलेली होती.
तिचा भंग
करावा असे
कुणालाही
वाटत
नव्हते.
आमोल घायाळ मुंबई
No comments:
Post a Comment