Tuesday, August 23, 2011

भन्नाट आलेला वारा सख्या ,

शब्द असे यावेत ओठानाही कळू नये..
भावना अश्या फुलाव्यात मनालाही कळू नये..
स्नेह असा जडावा स्नेहालाही कळू नये..
गीत असे म्हणावे निसर्गालाही कळू नये..
डोळ्यात अश्रू यावेत डोळ्यांनाही कळू नये..
प्रीत अशी उमलावी दोघांनाही कळू नये..


भन्नाट आलेला वारा सख्या ,फुलांना बघ उधळून गेला.

जाता जाता मनामध्ये ,पाकळ्यांचा सडा घालून गेला

प्रत्येक पाकळी वेचताना ,भुंग्याचा उर भरून आला
,
रंगात फुलाच्या रंगताना ,आठवणींचा ढग बरसून गेला !!!!!!!!!!!!!



No comments:

Post a Comment